नवऱ्याला रात्री झोपेतच मारण्याचा प्रयत्न, बायकोने ओलांडल्या सर्वच मर्यादा! ; पोलिसांची मोठी कारवाई.

यवतमाळ : गेल्या काही दिवसांपासून अशा काही धक्कादायक घटना घडत आहे, ज्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण आहे. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. जेथे बायकोने नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केलं. मध्यरात्री महिलेने असं काही केलं, ज्यामुळे नवरा दुसऱ्या दिवशी थेट रुग्णालयात पोहोचला. संबंधित घटना यवतमाळ येथे घडली आहे. अशात बयकोने नवऱ्याला मारण्याचा का प्रयत्न केला? अशा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. तर मिळालेल्या माहितीनुसार, अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याला झोपेत विजेचा शॉक देऊन ठार मारण्याचा प्रयत्न बयको आणि तिच्या प्रियकराकडून करण्यात आला.

संबंधित घटना कळंब तालुक्यातील पंगडी येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. नवऱ्याचं नाव गजानन मोरे असं असून वय 38 वर्ष आहे. तर कथित आरोपी महिलेचं नाव कवडी मोरे आणि तिच्या प्रियकराचं नाव विष्णू आत्राम असं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कवडी आणि विष्णू यांचे प्रेमसंबंध होते. पण दोघांच्या प्रेमसंबंधांमध्ये पती म्हणजे गजानन मोरे अडसर ठरत असल्याने त्याला जीवे मारण्याचा कट बायको आणि तिच्या प्रियकराने रचला.

गजानन मोरे याला पत्नी कवडी मोरे हिने प्रियकर विष्णू आत्राम ह्याच्या सांगण्यावरून विद्युत वायर ने शॉक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे गजानन मोरे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. घटनेनंतर  अनेकांना संताप देखील व्यक्त केला आहे.

कवडी हिने विद्यूत वायरला अ‍ॅल्युमिनियमची तार बांधूल गजानन मोरे याला मध्यारात्रू मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गजानन याच्या दोन्ही हातांच्या दंडाला विजेचा शॉक लागला. याप्रकरणी 8 मे रोजी कवडी आणि विष्णू यांच्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक केली आहे. आता पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आता या प्रकरणात पुढे काय  होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles