७ कोटी कर्मचाऱ्यांसाठी ‘गुडन्यूज’. ; पीएफपासून ही सर्व कामं एकदम झटपट.

नवी दिल्ली : केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटना सातत्याने मोठे बदल करत आहे. 7 कोटी कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा आणि क्लेम सेटलमेंट लवकर व्हावा यासाठी ईपीएफओने कंबर कसली आहे. लवकरच एटीएम आणि युपीआयच्या माध्यमातून पीएफ काढता येईल. तर सर्वात मोठा बदल हा निवृत्ती वेतनाविषयी असले. निवृत्तीनंतर पीएफ फंड सेटलमेंट ऑटोमॅटिक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. म्हणजे नोकरी सोडल्यानंतर पीएफची सर्व रक्कम आपोआप संबंधित कर्मचाऱ्याच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा होईल. त्यासाठी त्याला कार्यालयीन हेलपाटे मारावे लागणार नाही. सध्या ईपीएफओ कडून 5 लाख रुपयांपर्यंतचे अंशतः अथवा आगाऊ दाव्यांचा निपटारा स्वयंचलित पद्धतीने करण्यात येतो. क्लेम सेटलमेंट विनंती केल्यानंतर तीन दिवसात ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. आता या नवीन बदलाचा कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. त्यांना नोकरी सोडल्यानंतर पूर्ण पीएफ रक्कम काढण्यासाठी मोठी प्रतिक्षा करावी लागणार नाही.

पीएफ रक्कम काढण्याचा दावा स्वयंचलित पद्धतीने काढता येतील. ही सुविधा केवळ आगाऊ रक्कम काढण्यापूरतीच मर्यादीत होती. पण लवकरच फायनल पीएफ सेटलमेंटसाठी ही ऑटोमॅटिक प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याची माहिती ईपीएफओ आयुक्त रमेश कृष्णमूर्ती यांनी दिली. नवीन कामगार संहिता लागू झाल्यानंतर अजून मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

अर्ज करण्याची नाही गरज –

पीएफ खात्याचे स्वयंचलित दावा निपटाऱ्यासाठी कर्मचाऱ्यांना आता कोणताही अर्ज करावा लागणार नाही. नोकरी सोडल्यानंतर संबंधित पीएफ रक्कम तात्काळ काढता यावी यासाठी ऑटोमॅटिक ट्रान्सफरच्या सुविधेवर काम करण्यात येत असल्याची माहिती कृष्णमूर्ती यांनी दिली. नवीन कामगार संहितेमुळे EPF Scheme 1952, Insurance Scheme 1976, Employees Pension Scheme 1995 या तीनही योजना लागू झाल्या आहेत. या सर्व योजनांसाठी आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी ईपीएफओ काम करत असल्याचा दावा केंद्रीय कामगार सचिव वंदना गुरनानी यांनी केला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles