सावंतवाडी : कवठी युवक मित्र मंडळ, मुंबईचे अध्यक्ष संजय करलकर यांच्या मातोश्री श्रीमती सुनंदा अंकुश करलकर यांचे आज पहाटे साधारण ५:३० वाजण्याच्या दरम्यान, आजारपणावर उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुली, नातवंडे असा भला मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने करलकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्वर्गीय श्रीमती सुनंदा अंकुश करलकर या अत्यंत प्रेमळ, शांत, संयमी, सात्विक व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे निरागस हास्य, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याची पद्धत आणि मायेची ऊब आजही प्रत्येकाच्या स्मरणात कायम राहील. त्यांनी आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी प्रेम, त्याग, संस्कार आणि ममतेची अखंड ज्योत तेवत ठेवली.



