रात्र वैऱ्याची, आकाशात भीतीदायक काळोख ! ; ताशी ७० किमी वेगाने येतंय संकट.

नवी दिल्ली : भारतावर मोठं संकट गोंगावत आहे. मोठे आवाहन उभे आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे लवकर आगमन होत असतानाच चक्रीवादळ धडकणार आहे. अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. 26 मे रोजी केरळमध्ये नैऋत्य मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. आयएमडीनुसार, पुढील 24 तासांत मान्सूनला दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात जवळपास राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळ येऊ शकते. यादरम्यान तब्बल ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेशमध्ये मोठे थैमान पावसाचा घातले. जवळपास 100 लोकांचा जीव या चक्रीवादळात गेला. निसर्गाचा मोठा हाहाकार बघायला मिळाला. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. तीन ते चार दिवसात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. केरळ, पुदुचेरी, तामिळनाडू, कर्नाटक या भागात अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार, आणि पश्चिम बंगालमध्येही पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही पाऊस होण्याचा अंदाज आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात वादळ सुटेल.

वायव्य भारतात जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश येथे मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. राजस्थान, पंजाब आण हरियाणाच्या काही भागांमध्ये ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाच्या वाऱ्यासह धुळीची वादळे येण्याची शक्यता आहे. सध्याची हवामानाची परिस्थिती बघता पुढील काही तास देशाकरिता अत्यंत भयंकर असणार आहेत. अनेक भागात हे वादळ रात्री धडकण्याची शक्यता आहे.

पश्चिम राजस्थानसाठी धुळीच्या वादळाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्य भारतात, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराममध्ये पुढील काही दिवस मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. दक्षिण आसाममध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज आहे. देशावर निसर्गाचे मोठे संकट उभे आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोठा हाहाकार पावसाने आणि चक्रीवादळाने माजवला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles