महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कारप्राप्त साईल तळकटकर यांचा ‘मनसे’ नेत्यांकडून विशेष सन्मान!

सावंतवाडी : कोकणातील पारंपरिक दशावतार कलेला अभ्यासपूर्ण सादरीकरणातून नवे वैभव प्राप्त करून देणारे मनसे विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष साईल तळकटकर यांना “महाराष्ट्र प्रेरणा जनसेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या उल्लेखनीय यशाबद्दल मनसे नेते तथा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संपर्क अध्यक्ष संदिप दळवी यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कोकणातील लोकप्रिय दशावतार कलेतून विविध भूमिका प्रभावीपणे साकारत साईल तळकटकर यांनी रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. विशेषतः “राज पात्र” साकारताना त्यांनी अभ्यासपूर्ण अभिनय, प्रभावी संवादशैली आणि प्रबोधनात्मक मांडणी यांचा सुंदर संगम घडवत आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटवली. संयुक्त दशावतार तसेच विविध दशावतार कंपन्यांमधून त्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराची दखल घेत राजधानी सेवा प्रतिष्ठान आणि अनुश्री फाऊंडेशन, कराड-सातारा यांच्या वतीने हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला.
कराड, सातारा येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात साईल तळकटकर यांना सन्मानित करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलेचे प्रतिनिधित्व करत त्यांनी मिळविलेल्या या यशामुळे कला क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुरस्काराची बातमी समजताच मनसे उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी साईल तळकटकर यांचे अभिनंदन केले. त्यानंतर मनसे नेते संदिप दळवी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, जिल्हा सचिव गुरुदास गवंडे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष विनायक सावंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, तालुका सचिव सतीश आकेरकर, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, उमेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles