सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, कला आणि संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने “महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा वैभवपूर्ण आनंदोत्सव – असंघटीत लोककलावंतांचा महोत्सव” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवात राज्याच्या विविध भागांतून सुमारे १५० लोककलावंत सहभागी होऊन महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलांचे सजीव दर्शन घडविणार आहेत. लोकसंस्कृतीचा अनमोल ठेवा जपणाऱ्या विविध कलाप्रकारांनी सजलेला हा महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
🔸 शुक्रवार | २२ मे २०२६ | सायं. ६ वा.
🎶 करपल्लवी गोंधळी
🎭 बहुरुपी
🪘 धनगरी ओवी
🌿 हेळवी लोककला
💃 फुगडी आणि झिम्मा
🔸 शनिवार | २३ मे २०२६ | सायं. ६ वा.
🌾 आदिवासी पाटा गायन
🎎 खेळे कळसूत्री बाहुल्यांचा
💫 धिरो धिरो नृत्य
🦚 मयूर नृत्य
💃 लैंगी बंजारा नृत्य
🔸 रविवार | २४ मे २०२६ | सायं. ६ वा.
🎭 दशावतार
🌊 कोळी नृत्य
🎭 सोंगी मुखवटे
🥁 दिमडी, ढोलकी, ढोल-ताशा वाद्यवृंद जुगलबंदी
🎤 भारुड
✨ तसेच स्थानिक लोककलांचे विशेष सादरीकरण.
या महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लोकजीवनातील सांस्कृतिक वैभव, परंपरा आणि कलात्मक विविधतेचे अद्भुत दर्शन घडणार आहे.
या सांस्कृतिक सोहळ्यास सर्व कला रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलावंतांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.



