लग्नानंतर पत्नी मित्राशी फोनवर बोलायची, तलाठ्याने १२ दिवसात जीवन संपवले. ; पत्नी विरोधात गुन्हा.

आंबेजोगाई : लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच तलाठ्याने आपल्या घरात गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आंबेजोगाई शहराच्या लगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. आता या प्रकरणात गणेश कोळी यांच्या आईच्या तक्रारीवरुन गणेश यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नीचे अनैतिक संबंध आणि त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासाने गणेश कोळी यांनी हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता पोलिस करत आहेत. गणेश दत्तू कोळी या तलाठी तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाईच्या मोरेवाडी परिसरात घडली होती.आता या प्रकरणी गणेश यांची आई सुनंदा दत्तू कोळी यांनी सूनेविरोधातच फिर्यादी दिली आहे. आपल्या सूनेचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रास यामुळेच आपला मुलगा गणेशने हे पाऊल उचलल्याचे त्याच्या आईने म्हटले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

या प्रकरणी तलाठी दत्तू कोळी यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आपला मुलगा आणि सून लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना तेथे त्याला त्याच्या पत्नीचे वागणे संशयास्पद वाटू लागले.ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असते असे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली,मात्र तरीही त्याच्या पत्नीचे वागणे बदलले नाही. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली. २४ मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी गणेश कोळी मोरेवाडी,अंबाजोगाई येथे आला होता. २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की,पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाल्याचे फिर्यादीत केले नमूद आहे.

पोलीस शिपाई म्हणून भरतीनंतर तलाठी झाला –

गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस बलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. १३ मे रोजी गणेश दत्तू कोळी याचा विवाह बीड येथील तरुणीशी मोठ्या उत्साहात पार पडला. गणेशची पत्नी ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles