आमिर खानची तिसरी पत्नी कोण?

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आणि लोकप्रिय अभिनेता आमिर खान हा तिसऱ्यांदा बोहल्यावर चढत आहे. त्याच्या तिसऱ्या पत्नीचे नाव गौरी स्प्रॅट असं आहे. दोघे वर्ष 2023 पासून नात्याच्या बंधनात गुंफल्या गेले आहेत. दोघेही येत्या 5 जुलै रोजी लग्न बेडीत अडकणार आहे. लग्नाची तारीख समोर येताच दोघेही चर्चेत आले आहे. आमिर खान 61 व्या वर्षी तो लगीनगाठ बांधत आहे.

कोण आहे आमिरची पत्नी गौरी स्प्रॅट? 

गौरी स्प्रॅट ही बेंगळुरू शहरात राहते. ती आमिर खान याच्या पेक्षा 14 वर्षांपेक्षा लहान आहे. आमिर खान 61 वर्षांचा आहे. तर गौरी ही 47 वर्षांची आहे. तिने उटी येथील ब्लू माउंटेन शाळेतून सुरुवातीचे शिक्षण घेतले. पुढे तीने लंडन येथील युनिवर्सिटी ऑफ आर्ट्समध्ये फॅशन स्टायलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले. बॉलिवूडमध्ये आमिर खान या नावामागे मोठे वलय आहे. तर दुसरीकडे गौरी ही हेअर ड्रेसिंग आणि ब्युटी बिझनेसशी संबंधित आहे.

गौरीचा बंगळुरूत व्यवसाय काय?

गौरी स्प्रॅट ही बेंगळुरू येथे तिच्या आईने सुरू केलेला व्यवसाय सांभाळते. याशिवाय ती आमिर खान याची प्रोडक्शन कंपनी ‘आमिर खान प्रोडक्शन’ शी जोडल्या गेलेली आहे. आमिर आणि गौरी या दोघांची पहिली भेट जवळपास 26 वर्षांपूर्वी झाली होती. गेल्या वर्षी आमिर खानने स्वतः दोघे एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखत असल्याचे सांगितले. पण दोघांनी तीन वर्षांपूर्वी 2023 मध्ये एकमेकांना डेट करणे सुरू केले. तेव्हापासून दोघांच्या नात्यातील वीण घट्ट झाली. आता प्रेमाचे रुपांतर लग्नात होत आहे. आमिर खानचे हे तिसरे लग्न आहे.

मैत्री, प्रेम आणि आता लग्न

आमीर खान गौरीला एका नातेवाईकाच्या मदतीने पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये गप्पा रंगल्या. दोघांमध्ये मैत्री झाली. पण नंतर दोघे एकमेकांना ओळखत असले तरी 23 वर्षात ती केवळ मैत्री होती. त्यानंतर 2023 मध्ये दोघे एकमेकांना डेट करू लागले. गौरी स्प्रॅटचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या लग्नानंतर गौरीला एक सात वर्षांचा मुलगा आहे. आमिर खान याने गेल्या वर्षी 14 मार्च 2025 रोजी त्याच्या 60 व्या वाढदिवशी गौरीसोबतच्या नात्याची कबुली दिली होती. तीन वर्षांनी आता हे दोघे 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. या दोघांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles