सावंतवाडी : भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांचा वाढदिवस हा विविध सेवाभावी उपक्रमातून साजरा होत आहे. कोणताही जल्लोषी कार्यक्रम न करता साधेपणाने जनहिताचे विविध उपक्रम या दिवशी केले जात आहेत. माडखोल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी आज रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या वेळी श्री विशाल परब यांच्या समावेत श्री संजय राऊळ, जी जे राऊळ, दत्ताराम राऊळ, केतन आजगावकर, पप्पू गावडे, स्वप्निल राऊळ, अमित राऊळ, बंटी सावंत, रवी चव्हाण, सायली शिरवणकर, निशा शिरवणकर, श्रेया पानोलकर, तेजस्विनी पानोलकर, आदी भाजपा पदाधिकारी व मान्यवरांसह प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी वर्ग, परिचारिका वर्ग, ग्रामस्थ उपस्थित होते
विशाल परब यांच्या वाढदिवसाला प्राथमिक आरोग्य केंद्र माडखोलमध्ये रुग्णवाहिका सेवेत प्रदान.!
0
52