महेंद्रा अकॅडेमीचा विद्यार्थी सर्वेश मांडेलकरची ‘अग्निवीर’ पदावर निवड ; पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले अभिनंदन.!

सावंतवाडी : येथील महेंद्रा अकॅडेमीचा विद्यार्थी सर्वेश मांडेलकर याची नुकतीच अग्निवीर (इंडियन आर्मी) दलामध्ये निवड झालेली आहे. या प्रीत्यर्थ महेंद्रा अकॅडेमीतर्फे सर्वेशचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील तसेच N.S.G कमांडो भाऊ सावंत, अकॅडेमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, अकॅडेमीचे ग्राऊंड प्रशिक्षक बापू परब तसेच बाकी पोलीस तसेच आर्मी भरतीची तयारी करणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि सर्वेशसारखे आणखीन बरेच विद्यार्थी हे अकॅडेमीच्या माध्यमातून भरती व्हायला हवेत तसेच कोकणात देखील स्पर्धात्मक परीक्षांचे पोषक वातावरण तयार व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles