विकासभाईंच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन! ; आरपीडी प्रशालेत जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धासुमने!

✍️ रूपेश पाटील.

सावंतवाडी : “कार्याने जे उजळले जीवन, स्मृतींनी ते अमर झाले,
सेवेच्या त्या दीपस्तंभाला, आज पुन्हा वंदन झाले…!
विकासभाईंच्या विचारांची, राहो सदैव प्रेरणा,
जनसेवेच्या वाटेवरती, फुलो नवी चेतना..!”

समाजकारण, शिक्षण आणि जनसेवेच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे दिवंगत विकासभाई सावंत यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडी येथील आरपीडी प्रशालेत भावपूर्ण अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विकासभाईंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विकासभाई सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि लोकाभिमुख कार्याचा आढावा घेताना अनेकांनी आठवणींना उजाळा दिला.

यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, विकासभाईंचे बंधू अण्णा सावंत, ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, प्रभारी मुख्याध्यापिका डॉ. सुमेधा धुरी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विकासभाई सावंत यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि शिक्षण क्षेत्रासाठीचे योगदान यांचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना कृतज्ञतेने स्मरण केले. जयंतीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles