Monday, October 27, 2025

Buy now

spot_img

हॉकीत भारताचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं, कांस्य पदकाची आशा कायम, जर्मनी अंतिम फेरीत.

पॅरिस : भारतीय हॉकी संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. भारतीय संघाला जर्मनीनं 3-2 गोलनं पराभूत केलं. जर्मनीनं दुसऱ्या आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाविरुद्ध आक्रमक खेळ केला. यामुळं भारताला 3-2 अशा गोलनं पराभव स्वीकारावा लागला. भारतानं सामन्यात पहिल्या क्वार्टरमध्ये आघाडी घेतली होती. मात्र, जर्मनीनं दुसऱ्या क्वार्टरमध्ये पलटवार करत 2 गोल केले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारत 2-1 नं पिछाडीवर होता. भारताचा डिफेंडर अमित रोहिदास वर रेड कार्ड असल्यानं एका मॅचसाठी बंदी घातली गेली होती. याचा देखील भारताला फटका बसला. भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये अजूनही पदक मिळू शकतं. भारताला कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे.

भारताला कांस्य पदक जिंकण्याची संधी

भारतानं उपांत्य फेरीत पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला होता. भारतानं पहिला गोल करत आघाडी घेतली होती. मात्र, दुसऱ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं दोन गोल केले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतानं कमबॅक करत एक गोल केला आणि बरोबरी साधली. चौथ्या क्वार्टरमध्ये जर्मनीनं कमबॅक केलं आणि एक गोल केला. त्यामुळं भारताचा 3-2 असा पराभव झाला.  भारतानं अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी जंग जंग पछाडलं. मात्र, जर्मनीच्या बचाव फळीच्या तगड्या कामगिरीमुळं ते शक्य झालं नाही. अखेरच्या काही मिनिटात श्रीजेशला बाहेर बसवून भारतानं एक खेळाडू वाढवला. मात्र, नेमका त्यावेळी जर्मनीनं पेनल्टी कॉर्नर मिळवला. भारताच्या बचाव फळीनं गोल वाचवला. शेवटच्या दीड मिनिटात भारतानं दोनवेळा जर्मनीविरुद्ध गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र यश आलं नाही.

भारतीय संघानं अखेरच्या क्षणापर्यंत लढत दिली मात्र गोल करण्यात यश आलं नाही. जर्मनीच्या तुलनेत भारताला पेनल्टी कॉर्नर अधिक मिळाले होते. मात्र, त्यांना गोल करण्यात अपयश आलं. भारताला अजूनही कांस्य पदक जिंकण्याची संधी असून भारत आणि स्पेन यांच्यात कांस्य पदकासाठी लढत होईल. भारत आणि स्पेन यांच्यातील कांस्य पदकाची मॅच 8 ऑगस्टला सायंकाळी  5.30 वाजता होईल.

भारताचा गोलकीपर पीआर श्रीजेशची करिअरमधील अखेरची मॅच 8 ऑगस्टला होणार आहे. भारत त्या मॅचमध्ये विजय मिळवून पीआर श्रीजेशला अनोखं फेअरवेल देण्याचा प्रयत्न करेल. भारताचा बचाव फळीचा खेळाडू अमित रोहिदास देखील संघात परतल्याचा फायदा होईल.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles