भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली ‘मन की बात’ कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद! ; सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रविकासाचा निर्धार!

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने व नेतृत्वाखाली आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंतप्रधानांनी ‘विकसित भारत’ या संकल्पनेपासून ते जनसहभाग, सामाजिक परिवर्तन, पर्यावरण संवर्धन, आत्मनिर्भर भारत आणि राष्ट्रहिताच्या विविध विषयांवर केलेले मार्गदर्शन उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.

विशाल परब यांनी प्रत्येक कार्यकर्त्याने पंतप्रधानांच्या विचारांना कृतीत उतरवून समाजहित आणि राष्ट्रहितासाठी सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत भाजपची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून पुन्हा एकदा दिसून आले.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या विचाराला दृढ पाठिंबा देत विकसित भारताच्या निर्मितीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles