वाढवण बंदर महाराष्ट्राच्या सागरी सामर्थ्याला देणार नवी झेप! : CM देवेंद्र फडणवीस. ; महत्त्वाकांक्षी वाढवण बंदर प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांचा घेतला आढावा. ; मुख्यमंत्री फडणवीस व बंदरे मंत्री नितेश राणे यांची वाढवण प्रकल्पस्थळी पाहणी.

  • महाराष्ट्राला आणि देशाला सागरी शक्ती म्हणून नवी ओळख मिळणार! : मुख्यमंत्री फडणवीस.
  • व्यापार, उद्योग आणि आर्थिक विकासाला मिळणार नवी गती.

पालघर : चिंचणी – पालघर येथे प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याची मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी पाहणी करून, या परिसरात बंदरे खात्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध पायाभूत सुविधा व विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.दरम्यान “वाढवण बंदर उभारल्यानंतर पुढील ३० ते ४० वर्षे महाराष्ट्राला आणि देशाला सागरी शक्ती म्हणून नवी ओळख मिळून हे बंदर व्यापार, उद्योग आणि आर्थिक विकासाला नवी गती देईल.”असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


वाढवण बंदर हा महाराष्ट्राच्या सागरी विकासाला नवी दिशा देणारा आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यादृष्टीने आवश्यक नियोजन व विकासकामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

यावेळी वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.पी.प्रदीप तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles