नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती! ; संजू परब खवळले! ; ज्येष्ठ शिक्षकांच्या घरात पाणी शिरले, परबांनी घेतली धाव.

सावंतवाडी : शहरातील माठेवाडा परिसरात नगरपालिकेच्या हलगर्जीपणा व नियोजनातील त्रुटींमुळे पावसाचे पाणी थेट ८१ वर्षीय निवृत्त शिक्षक चंद्रकांत आकेरकर यांच्या घरात शिरल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या ५० वर्षांत या ठिकाणी अशी घटना कधीच घडली नव्हती, त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री. संजू परब यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नगरपालिकेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

घटनास्थळी उपस्थित नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने पाणी साचण्याची समस्या दूर करण्याच्या, संबंधित ठिकाणी योग्य निचऱ्याची व्यवस्था करण्याच्या तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना श्री. परब यांनी दिल्या.

यावेळी परिसरातील नागरिकांनीही नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप करत जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles