ठाणे पोलीस दलात मोठा फेरबदल. ; तब्बल ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली?

ठाणे : ठाणे पोलीस दलातून मोठी बातमी हाती आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाने प्रशासकीय निकडीचे कारण देत पोलीस निरीक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बदल्या केल्यात. यासंदर्भात प्रशासनाने नवीन नियुक्त्यांचे आदेश जारी केले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतुदींनुसार, पोलीस स्थापना मंडळाच्या बैठकीनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. या फेरबदलात अनेक अधिकाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळाल्यात. तर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना आधी असलेल्या पदावर मुदतवाढ देण्यात आलीये.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाने बदल्यांचे आदेश काढलेत. या बदल्यांमध्ये गुन्हे शाखेचे सचिन पांडुरंग गायकवाड, प्रतिबंधक कक्षाच्या सुषमा संदीप सोनावणे (येवले) आणि राजेंद्र जयवंत निकलजे यांना प्रशासकीय कारणास्तव १ वर्षाची स्थगिती म्हणजेच मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. तर डोंबिवली, मुंब्रा, कोळशेवाडी, तिलकनगर, कासारवडवली, भिवंडी शहर आणि आर्थिक गुन्हे शाखेसह विविध विभागांमध्ये निरीक्षकांची नव्याने नियुक्ती करण्यात आलीये. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नवीन ठिकाणी रुजू होण्याचे निर्देश देण्यात आलेत.

कोणाची कुठे झाली बदली?

पोलीस निरीक्षकाचे नाव | सध्याचे नियुक्तीचे ठिकाण | बदलीचे नवीन ठिकाण |

अशोक रावजी उतेकर | पीओ.एस.टी. ला रिपोर्ट करणे | व्ही.पी.ओ. वागले इस्टेट पी.एस.टी. |

गणेश संभाजीराव जावडवाड | डोंबिवली पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. मुंब्रा पी.एस.टी. |

अभय चंद्रनाथ महाजन | नौपाडा पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. कोळशेवाडी पी.एस.टी. |

सुरेश सिंह राम सिंह गंड | मार्केट पोलीस ठाणे | खडकपाडा पोलीस ठाणे |

राजेश सदाशिव शिरसाठ | विशेष शाखा | मुंब्रा पोलीस ठाणे |

नितीन दौलतराव वेतन | विशेष शाखा | शहर वाहतूक शाखा |

गहिनीनाथ सरजेराव खेल | विष्णुनगर पोलीस ठाणे | शिवाजीनगर पोलीस ठाणे

सुधाकर शंकर यादव | शहर वाहतूक शाखा | मुंब्रा पोलीस ठाणे |

अमरनाथ रामचंद्र वाघमोडे | विशेष शाखा | कोळशेवाडी पोलीस ठाणे |

राजू भीकाजी पचोरकर | शहर वाहतूक शाखा | व्ही.पी.एन. डोंबिवली पी.एस.टी. |

विनोद भालेराव पाटील | शांतीनगर पोलीस ठाणे | भिवंडी शहर पोलीस ठाणे |

गणेश मधुकर न्हायाडे | कोळशेवाडी पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. राबोडी पी.एस.टी. |

बाबासाहेब भास्कर दुकाले | मार्केट पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. मार्केट पोलीस ठाणे |

अतुल सुरेश अडुरकर | शांतीनगर पोलीस ठाणे | भिवंडी शहर पोलीस ठाणे |

मल्हारी किसन मेमणे | वर्तकनगर पोलीस ठाणे | आर्थिक गुन्हे शाखा (EOW)

सवाजी गोविंद नाईक | कोळशेवाडी पोलीस ठाणे | महात्मा फुले चौक पोलीस ठाणे

पंकज प्रहलाद भलेराव | डोंबिवली पोलीस ठाणे | कोळशेवाडी पोलीस ठाणे |

विजय भीमराव नाईक | महात्मा फुले चौक पोलीस ठाणे | व्ही.पी.एन. टिळकनगर पी.एस.टी. |

अनिल नाथुराम गायकवाड़ | पीओ.एस.टी. ला रिपोर्ट करणे | नियंत्रण कक्ष, कल्याण |

अनिल चंद्रकांत शिंदे | मुंब्रा पोलीस ठाणे | कासारवडवली पोलीस ठाणे

विशाखा बजरंग झंडे | त्वरित प्रतिसाद विभाग | चितळसर पोलीस ठाणे

रंजन रघुनाथ सावंत | कासारवडवली पोलीस ठाणे | वर्तकनगर पोलीस ठाणे |

प्रतापराव अशोकराव भोसले | ठाणेनगर पोलीस ठाणे | पोलीस ठाण्याला व्ही.पी.एन. रिपोर्ट करणे |

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles