देहातूनही जपली मानवसेवेची ज्योत!, मनिषा तांडेल यांचे मरणोत्तर देहदान! ; जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने देहदानाचा २२० वा संकल्प साकार.

मालवण : मानवसेवेचा सर्वोच्च आदर्श जपत देवबाग (ता. मालवण) येथील सौ. मनिषा मधुसूदन तांडेल यांच्या मरणोत्तर देहदानाची प्रक्रिया शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे पार पडली. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेतून हा प्रेरणादायी निर्णय घेण्यात आला.

यावेळी त्यांचे पती मधुसूदन भिसाजी तांडेल, दिर रमाकांत भिसाजी तांडेल तसेच तांडेल कुटुंबीय उपस्थित होते. त्यांच्या या निर्णयामुळे वैद्यकीय शिक्षण व संशोधनासाठी महत्त्वपूर्ण योगदान मिळणार आहे.

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने आजपर्यंत २२० मरणोत्तर देहदान आणि १८२ अवयवदान करण्यात आले असून, समाजात देहदान व अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्यात हा उपक्रम मोलाची भूमिका बजावत आहे.

देहदान प्रक्रियेवेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. दवंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, शरीरशास्त्र विभागप्रमुख प्राजक्ता थेटे, नेत्र शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब जोशी, नेत्रचिकित्सा अधिकारी डॉ. कौस्तुभ देशपांडे, नेत्रदान समुपदेशक सिद्धार्थ कांबळे तसेच कर्मचारी गोसावी आदी उपस्थित होते.

यावेळी रामानंद संप्रदाय सिंधुदुर्गचे पदाधिकारी आणि जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनिषा तांडेल यांच्या देहदानाच्या निर्णयामुळे समाजासमोर मानवतेचा आणि सेवाभावाचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles