गणित प्रज्ञा परीक्षेत मिलाग्रीस प्रशालेची चमकदार कामगिरी!

सावंतवाडी : गणित विषयातील विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, तर्कशक्ती आणि विश्लेषणात्मक कौशल्यांचा कस पाहणाऱ्या गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित गणित प्रज्ञा परीक्षा २०२६ मध्ये मिलाग्रीस प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या परीक्षेच्या ‘सिल्वर गटात’ प्रशालेतील तीन विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. इयत्ता पाचवीतील कु. रुद्र देसाई, तसेच इयत्ता आठवीतील कु. शुभंकर पाटकर आणि कु. जान्हवी गावडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशालेचे नाव उज्ज्वल केले.
या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक रेव्ह. फादर रीचर्ड सालढाणा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. विद्यार्थ्यांच्या या यशाचे कौतुक करत त्यांनी पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे मिलाग्रीस प्रशालेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles