आयुष्मान भारत योजनेत खोट्या तक्रारींचे वाढते प्रमाण, डॉक्टरांमध्ये चिंता! ; ‘तक्रार केली की शासनाकडून पैसे मिळतात’, या गैरसमजामुळे प्रकार वाढल्याचा दावा. ; चौकशीत तक्रारी ठरताहेत खोट्या.

सिंधुदुर्ग : आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांविरोधात खोट्या तक्रारी करण्याचे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत असल्याची बाब समोर येत आहे. ‘जिल्हा स्तरावर तक्रार केली की शासनाकडून पैसे मिळतात’ असा गैरसमज काही लाभार्थ्यांमध्ये निर्माण झाल्याने अशा तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याचा दावा संबंधित डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.

यापूर्वीही अशा काही तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र, त्यांची चौकशी केल्यानंतर अनेक तक्रारी तथ्यहीन व खोट्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही अशा तक्रारी सातत्याने होत असल्याने प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या डॉक्टरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांच्या मते, लाभार्थ्यांमध्ये योग्य जनजागृती होणे आवश्यक आहे. तक्रार करण्याचा अधिकार प्रत्येक रुग्णाला असला तरी ती वस्तुनिष्ठ आणि पुराव्यांवर आधारित असावी. खोट्या तक्रारींमुळे डॉक्टरांची प्रतिमा मलिन होण्याबरोबरच चौकशी यंत्रणांवरही अनावश्यक ताण येत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

याबाबत प्रशासनानेही तक्रारींची सखोल पडताळणी करूनच पुढील कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles