मिलाग्रीस हायस्कूलच्या मान्सून स्पोर्टची जिल्हा क्रीडा अधिकारींच्या उपस्थितीत दिमाखदार सुरुवात.

सावंतवाडी : येथील मिलाग्रीस हायस्कूल सावंतवाडी येथे आजपासून मॉन्सून स्पोर्ट अर्थात पावसाळी खेळांची दिमाखदार सुरुवात झाली. या दिमाखदार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी श्रीमती माधुरी घरळ उपस्थित होत्या. प्रारंभी प्रशालेचे प्राचार्य फादर रिचर्ड सालढाणा यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ व रोपटे देऊन स्वागत केले.
प्रशालेच्या या दिमाखदार सोहळ्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसला. दिनांक 10 आणि 11 जुलै अशा दोन दिवसीय पावसाळी खेळांसाठी सर्वच विद्यार्थी हिरहीरीने सहभागी होणार आहेत.
याप्रसंगी बोलताना खेळांचे जीवनातील महत्त्वाचे स्थान अधोरेखित केले तसेच विद्यार्थ्यांना खेळाविषयी जागरूक राहण्याचा मोलाचा सल्ला दिला. प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना खेळात सातत्य राखण्यासाठी प्रामाणिकपणा सचोटी या गुणांचा मार्ग दाखवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. जेनेट अल्मेडा यांनी केले तसेच प्रशालेचे हायस्कूल लिपिक श्री जयदेव सर यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले .

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles