नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांची सद्गुरू मियांसाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त समाधीस्थळी भावपूर्ण वंदना! ; जनकल्याणासाठी सद्गुरू चरणी केली मनोभावे प्रार्थना!

सावंतवाडी : येथील परमपूज्य सद्गुरू श्री मियांसाहेब यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या पावन सोहळ्याचे औचित्य साधत नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोंसले यांनी सद्गुरू मियांसाहेबांच्या समाधीस्थळी जाऊन चादर अर्पण करून भावपूर्ण दर्शन घेतले.

सद्गुरूंच्या पवित्र चरणी नतमस्तक होत त्यांनी शहरातील जनतेच्या सुख-समृद्धी, शांतता आणि सर्वांगीण कल्याणासाठी मनोभावे प्रार्थना केली. श्रद्धा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम या भेटीतून अनुभवास आला. यावेळी नगर परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती दिपाली भालेकर उपस्थित होत्या. पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी परिसरात भक्तांची मोठी गर्दी झाली असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावाने पार पडत आहेत.

 
सद्गुरूंच्या चरणी व्यक्त झालेली ही कृतज्ञता आणि जनकल्याणाची प्रार्थना शहरवासीयांसाठी आशा व सौहार्दाचा संदेश देणारी ठरली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles