घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात २३ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबीर. ; मोफत आरोग्य व नेत्र तपासणीही होणार.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन घावनळे कासमळा येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदमाता परिवार, घावनळे यांच्या वतीने आयोजित या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन मठाचे अध्यक्ष दादा गवस यांनी केले आहे.

रक्तदान शिबिरासोबतच एसएसपीएम हॉस्पिटल, पडवे यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तसेच श्री मातोश्री सेवाधाम आरोग्य ट्रस्ट, मुंबई यांच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी करण्यात येणार असून, उत्कृष्ट दर्जाचे चष्मे केवळ ₹१८० मध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

रक्तदान शिबिराची वेळ सकाळी ९ वाजल्यापासून असून, आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालणार आहे. या उपक्रमासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, शाखा-वेंगुर्ला यांचे सहकार्य लाभले आहे.

रक्तदाते, स्वामीभक्त तसेच परिसरातील नागरिकांनी या ईश्वराधिष्ठित सेवाकार्यात सहभागी होऊन रक्तदानाचा अमूल्य संकल्प पूर्ण करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क :
अमित चव्हाण – ९१३०७६४१६४

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles