पत्रकार सिताराम गावडे यांच्या कुटुंबीयांची आमदार निलेश राणे यांनी घेतली भेट! ; समर्थच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक!

सावंतवाडी : पत्रकार सिताराम गावडे यांच्या मुलगा समर्थ याच्या बुधवारी रात्री झालेल्या दुःखद निधनानंतर आमदार निलेश राणे यांनी गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी गावडे कुटुंबीयांचे सांत्वन करत समर्थला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

या प्रसंगी आमदार राणे यांनी गावडे कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त करत त्यांना धीर दिला. तसेच या कठीण प्रसंगात संपूर्ण कुटुंबाला मानसिक बळ मिळावे, अशी प्रार्थना केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब तसेच उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडिस हे देखील उपस्थित होते. त्यांनीही गावडे कुटुंबीयांची भेट घेऊन शोकसंवेदना व्यक्त केल्या. परिसरातील नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही गावडे कुटुंबीयांचे सांत्वन करत समर्थच्या अकाली निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles