Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त रावराणे महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न.

वैभववाडी : वैभववाडीचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रक्तदान शिबीर संपन्न झाले. आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, वैभववाडी पोलीस ठाणे व जीवनधारा रक्तपेढी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीर हे वैभववाडीचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या ६ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजीत करण्यात आले. सदर शिबिरामध्ये एकूण ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त करताना जीवनधारा रक्तपेढी, कोल्हापूरचे डॉ. नयनीश मोरे यांनी रक्तदानाचे महत्व व गरज समजावून सांगताना समाजातील प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे असे आवाहन केले.

सदर शिबिराच्या उद्धघाटनप्रसंगी महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या स्थानिक समितीचे अध्यक्ष सज्जनकाका रावराणे, स्थानिक समितीचे सचिव प्रमोद रावराणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, प्रकाश कुमार रावराणे, विजय रावराणे, सुनील अवसरमोल (पोलीस निरीक्षक, वैभववाडी पोलीस ठाणे), डॉ. नयनीश मोरे (जीवनधारा ब्लड सेंटर कोल्हापूर), श्री. राजेश पडवळ (सिंधूरक्त मित्र प्रतिष्ठान, वैभववाडी) हे मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्यावतीने करण्यात आले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles