अखेर मंगळूरू एक्सप्रेस सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबली. ; प्रवासी संघटनेकडून जल्लोषपूर्ण स्वागत

सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजूर झालेल्या मंगळूरू एक्स्प्रेसच्या थांब्यानंतर आज सकाळी प्रथमच ही गाडी स्थानकात दाखल झाली. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच तालुक्यातील नागरिकांनी गाडीचे जल्लोषात स्वागत केले.

ADVT

 

यावेळी रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. रेल्वेला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. १६ वर्ष या गाडीसाठी प्रयत्न सुरू होते. गेली ४ वर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर आज मोठं यश आम्हाला मिळाल आहे‌. सुपरफास्ट एक्स्प्रेसला सावंतवाडीत थांबा मिळाला. यासाठी रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे, मंत्री व सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानतो. तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार लोकनेते मधू दंडवते टर्मिनस असं नाव या स्थानकाला मिळालं आहे‌. त्यामुळे त्या नावाला शोभेल अस टर्मिनस लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून निर्माण व्हावं अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, सावंतवाडीकर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles