नव्या शिक्षण मंत्र्यांकडून बलात्काराच्या आरोपींना सोडण्याचं समर्थन, मी पुरावे देईन! ; प्रियंका गांधींचा संसदेत मोठा आरोप.

नवी दिल्ली : काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी आज लोकसभेत सरकारला वेगवेगळ्या मुद्द्यांवरून घेरण्याचा प्रयत्न केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी प्रल्हाद जोशी यांच्याकडे देण्यात आली आहे. आज प्रियंका गांधी यांनी जोशी यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे लोकसभेत मोठा गोंधळ उडाला. प्रियंका गांधी यांनी प्रल्हाद जोशी यांनी गर्भवती महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना मुक्त करण्यास सहमती दर्शवली होती असं विधान केले. यामुळे सत्ताधारी खासदारांनी गोधळ घातला.

प्रियंका गांधींचे प्रल्हाद जोशींबाबात आक्षेपार्ह विधान –

लोकसभेत भाषण करताना खासदार प्रियंका गांधी यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी नव्या शिक्षण मंत्रिपदी अशा व्यक्तीची निवड केली आहे, ज्यांनी गर्भवती बलात्कार पीडितेच्या दोषींना मुक्त करण्यास सहमती दिली होती. या विधानानंतर लोकसभा सभापतींनी त्यांना रोखले आणि सत्ताधारी सदस्यांनी जोरदार गदारोळ केला. यावर प्रियंका गांधी यांनी वृत्तपत्रांमध्ये असं छापलेले आहे असं म्हटलं. यानंतर संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी या विधानावर आक्षेप घेत, प्रियंका गांधी यांची टिप्पणी ही एका प्रकारचे चारित्र्यहनन आहे. अशा भाषेची अपेक्षा नाही. हे वक्तव्य सभागृहाच्या नोंदीतून हटवावे. संसदेतील चर्चेची पातळी खालावू नये. जबाबदारीने बोलले पाहिजे. जर त्या पुरावे देऊ शकत नसतील तर त्यांनी माफी मागावी.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles