सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच मिळणार आहे. ”कामाला लागा.!’ असे आशीर्वाद पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्हाला दिले आहेत. त्यामुळे निश्चितच अर्चना घारे-परब निवडणूकीच्या रिंगणात महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून उतरणार अशी माहिती सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी दिली. येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी श्री. दळवी म्हणाले, आमचा शरद पवार यांच्यावर विश्वास आहे. ते आमच्या पाठीशी आहेत. हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा असून येथून अर्चना घारे-परब या महाविकास आघाडीच्या उमेदवार असणार आहेत. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय होईल. इतर चर्चाबाबत आज बोलणार नसून योग्यवेळी भुमिका स्पष्ट करू असंही ते म्हणाले.
सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, महिला तालुका अध्यक्ष वेंगुर्ला सौ. दीपिका राणे, दोडामार्ग महिला तालुकाध्यक्ष सौ. ममता नाईक, शहराध्यक्ष सावंतवाडी देवेंद्र टेमकर, शहराध्यक्ष दोडामार्ग सुदेश तुळसकर, तालुका सरचिटणीस, हिदायतुल्ला खान, युवती जिल्हाध्यक्ष सौ. सावली पाटकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष संजय भाईप, कृष्णा नाईक, सुधा सावंत, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, तालुका उपाध्यक्ष संतोष जोईल, युवक अध्यक्ष विधानसभा विवेक गवस, तालुका उपाध्यक्ष तौसीफ आगा, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष नारायण आसोलकर, सूर्याजी नांगरे, दोडामार्ग तालुका उपाध्यक्ष विलास सावळ व महादेव देसाई, युवक अध्यक्ष दोडामार्ग गौतम महाले, साबाजी देसाई, सागर नाईक, अल्पसंख्यांक शहर सरचिटणीस रजब खान यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.