– ७१ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; विजेत्यांना रोख रक्कम, चषक, मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरव.
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै. सूर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकॅडमीतर्फे विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी शहर मर्यादित कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पाटणकर वाडा येथील ॲकॅडमीच्या कॅरम प्रशिक्षण केंद्रात झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांमधील पहिली ते दहावीपर्यंतच्या ७१ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या वेळी मुक्ताई ॲकॅडमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना कॅरम खेळातील बारकावे, तंत्र आणि नियमित सरावाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना ॲकॅडमीच्या सरचिटणीस स्नेहा पेडणेकर आणि राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विजेत्यांना रोख रक्कम, चषक, मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटांत घेण्यात आली. प्रत्येक गटात मुलांसाठी चार आणि मुलींसाठी तीन अशा एकूण २१ पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी कौस्तुभ पेडणेकर यांनी लवकरच बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे आभार स्नेहा पेडणेकर यांनी मानले.
पारितोषिकप्राप्त विद्यार्थी
गट पहिला : पहिली ते तिसरी
🥇 प्रथम – आदित्य सुर्वे
🥈 द्वितीय – मितांश पेडणेकर
🥉 तृतीय – हर्षवर्धन गुरव
🏅 चतुर्थ – शहजान नदाफ
मुली :
🥇 प्रथम – चैतन्या दाभोलकर
गट दुसरा : चौथी ते सहावी
🥇 प्रथम – जयेश जाधव
🥈 द्वितीय – रत्नजित मोहिते
🥉 तृतीय – मोहम्मद फैजान खान
🏅 चतुर्थ – नुमान नदाफ
मुली :
🥇 प्रथम – आर्या शेख
गट तिसरा : सातवी ते दहावी
🥇 प्रथम – आस्था लोंढे
🥈 द्वितीय – चारुदत्त गवंडे
🥉 तृतीय – स्मित सावंत
🏅 चतुर्थ – अरमान शेख
मुली :
🥇 प्रथम – आरजू शेख
🥈 द्वितीय – ईशानी सावंत



