राजनने ते गंभीर पाऊल का उचलले? – वेत्येत तरुणाची आत्महत्या!, पंचक्रोशीत हळहळ, कुटुंबावर दुःखाचा डोंगर.

सावंतवाडी : वेत्ये येथील राजन रामा गावडे (वय ४५) यांनी राहत्या घरात विषारी औषधाचे सेवन केल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा प्रकार काल गुरुवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आल्यानंतर वेत्ये गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली.

राजन गावडे यांनी राहत्या घरी विषारी औषधाचे सेवन केल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच वेत्येचे सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. गावातील एका तरुणाचा अशा प्रकारे अचानक मृत्यू झाल्याने उपस्थितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली.

राजन गावडे यांच्या पश्चात भाऊ, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेची बातमी समजताच वेत्ये तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. हसतमुख चेहरा आणि आपुलकीचा स्वभाव असलेल्या राजन गावडे यांच्या अकाली निधनाने गावातील परिचित आणि मित्रपरिवारावरही शोककळा पसरली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles