सावंतवाडी : भविष्यातील सक्षम, जबाबदार आणि राष्ट्रनिष्ठ नेतृत्वाची बीजे बालमनात रुजविण्याच्या उद्देशाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये आयोजित विद्यार्थी परिषद शपथविधी व पदग्रहण सोहळा शनिवारी (८ ऑगस्ट) उत्साह, शिस्त आणि प्रेरणादायी वातावरणात दिमाखात पार पडला. ‘नेतृत्वातून सेवा आणि सेवेतून उत्कृष्टता’ हा संदेश देणाऱ्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाला सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते तसेच शाळेचे संचालक ॲड. रुजुल पाटणकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत आणि शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व प्रार्थनेने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात झाली.
प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी विद्यार्थी परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती देताना विद्यार्थ्यांनी नामांकन, छाननी, प्रचार, मतदान आणि मतमोजणी या लोकशाही पद्धतीने आपल्या प्रतिनिधींची निवड केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लोकशाही प्रक्रियेचा अनुभव मिळत नेतृत्वाची पहिली पायरी गाठता आली.
यानंतर नवनिर्वाचित हेड बॉय, हेड गर्ल, हाऊस कॅप्टन व व्हाइस कॅप्टन यांना मान्यवरांच्या हस्ते बॅज व सॅश प्रदान करण्यात आले. विविध हाऊसचे ध्वज व बॅनरही विद्यार्थ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. पदभार स्वीकारताना विद्यार्थी प्रतिनिधींनी कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, शिस्त, जबाबदारी आणि शाळेच्या मूल्यांचे पालन करण्याची शपथ घेतली.
या विद्यार्थी परिषदेचे हेड बॉय कु. शौर्य चव्हाण, हेड गर्ल कु. श्री कोरगावकर यांच्यासह अग्नी हाऊसच्या कॅप्टन कु. निधी शिर्के, व्हाइस कॅप्टन कु. योगांक करिवडेकर, पृथ्वी हाऊसचे कॅप्टन कु. नील सावंत, व्हाइस कॅप्टन कु. कवीश पेडणेकर, वायू हाऊसचे कॅप्टन कु. पृथ्वीराज गवस, व्हाइस कॅप्टन कु. गायत्री तानावडे, जल हाऊसचे कॅप्टन कु. रेहान सारंग आणि व्हाइस कॅप्टन कु. अनिका सुकी यांनी पदभार स्वीकारला.
तसेच स्पोर्ट्स विभाग विद्यार्थी प्रमुख कु. यज्ञेश पवार, कल्चरल विभाग प्रमुख कु. तनिष्क पवार, असेम्ब्ली विभाग प्रमुख कु. गौरीश परब, डिसिप्लिन विभाग प्रमुख कु. अस्मि प्रभू तेंडोलकर, एन्व्हायर्नमेंट विभाग प्रमुख कु. सई नाईक, हेल्थ अँड हायजिन विभाग प्रमुख कु. प्रत्युशा घोगले, क्लिनलीनेस विभाग प्रमुख कु. हिना सारंग, फायनान्स विभाग प्रमुख कु. विहान राणे, एनर्जी कॉन्झर्वेशन विभाग प्रमुख कु. देवांग सारंग आणि गार्डनिंग विभाग प्रमुख कु. विहान बिरमोले यांनीही आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या.
विद्यार्थी परिषदेतील प्रीफेक्ट म्हणून कु. सायना अळवणी, कु. हेरंब नाटेकर, कु. सक्षम ओटावणेकर, कु. आराध्य शेटवे, कु. ऋतुजा पेडणेकर, कु. ध्यानी बथानी, कु. सौजन्या काजरेकर, कु. निलया शिंदे, कु. लिशा सामंत आणि कु. नुवैरा सय्यद यांची निवड करण्यात आली.
नव्याने निवड झालेल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी आत्मविश्वासाने पदभार स्वीकारत शाळेच्या प्रगतीसाठी तन-मनाने योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता, आत्मविश्वास, संघभावना, सहकार्य आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव विकसित होण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
प्रमुख पाहुणे तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थी परिषद निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही प्रक्रियेबाबत जागृती निर्माण झाल्याचे सांगितले. अभ्यासक्रमासोबतच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
शाळेचे संस्थापक अॅड. रुजुल पाटणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करावेत. आपल्या गावातील आणि समाजातील अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची वृत्ती विद्यार्थ्यांनी जोपासावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी सहायक शिक्षिका सौ. अमृता मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. ग्रीष्मा सावंत यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले.
शाळेचे संचालक ॲड. रुजुल पाटणकर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर आणि प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. निधी सावंत यांनी नवनिर्वाचित विद्यार्थी परिषदेसह सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिस्तीच्या चौकटीत नेतृत्वाची मशाल हाती घेत, जबाबदारीची जाणीव मनात रुजवत आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा उराशी बाळगत नव्या विद्यार्थी परिषदेने घेतलेली ही शपथ स्टेपिंग स्टोनच्या शैक्षणिक वाटचालीतील एक संस्मरणीय अध्याय ठरला.



