आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाची युवा महोत्सवात चमकदार कामगिरी! ; भारतीय लोकनृत्यात तृतीय तर प्रहसन व रांगोळीमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक.

वैभववाडी : मुंबई विद्यापीठ आयोजित ५९ व्या युवा महोत्सवात आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवले आहे.
भारतीय लोकनृत्य प्रकारात तृतीय क्रमांक, तर प्रहसन (स्किट) आणि रांगोळी या प्रकारांत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची प्रभावी छाप उमटवली आहे.
भारतीय लोकनृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोककलेचा सुंदर आविष्कार सादर केला. आकर्षक वेशभूषा, तालबद्ध नृत्य, सांघिक सादरीकरण आणि प्रभावी नृत्याविष्कार यामुळे त्यांच्या सादरीकरणाला परीक्षकांची दाद मिळाली. प्रहसनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक आशय, प्रभावी अभिनय व संवादफेकीतून मांडला. तसेच रांगोळी स्पर्धेत कल्पकता, आकर्षक रंगसंगती आणि कलात्मकतेचा सुंदर मिलाफ साधत विद्यार्थ्यांनी लक्षवेधी रांगोळी साकारली.
या यशामागे महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. राहुल भोसले यांच्यासह सदस्य प्रा. दिनेश बेटकर, प्रा. निलेश कारेकर आणि डॉ. केशव पाखरे यांनी विशेष घेतलेले घेतले.
महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण आणि कार्यालयीन अधीक्षक संजय रावराणे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रासोबतच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अशीच उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles