मोठी बातमी! – नाशिक पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरलं, नागरिकांमध्ये घबराट!

नाशिक : जिल्ह्यात पुन्हा एकदा भुकंपाचे धक्के जाणवले आहे..पाच दिवसांपुर्वी झालेल्या भुकंपानंतर काल मध्यरात्री १२ वाजून ०६ मिनिटांनी कळवण तालूक्याच्या पश्चिम पट्ट्यातील आंबुर्डी, अभोणा, कनाशी, वेरुळ, अंबापूर या गावांना सौम्य धक्के बसले. ३.५ मीटरचे हे धक्के ३ ते ५ सेकंद जाणवले. दरम्यान भकंपाचे धक्के जाणवताच वीज सुध्दा गायब झाली..सौम्य धक्का जाणवल्याने नुकसानी बाबत कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान ‘नाशिक आणि गुजरातच्या परिसरात भूगर्भात अनेक हालचाली सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पाणी जमिनीत झिरपले आहे. टेक्टॉनिक प्लेट्स मध्ये मोठ्या हालचाली झाल्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. ठराविक अंतराने धक्के बसत आहेत ही चांगली गोष्ट आहे, कारण त्यामुळे भूकंपाचा मोठा धक्का बसण्यापासून संरक्षण होते. आगामी काळात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या संदर्भातील आवश्यक काळजी घेणं गरजेचं आहे, अशी माहिती नाशिकचे भूकंप अभ्यासक डॉ.किरणकुमार जोहार यांनी दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles