🇮🇳 विभाजन विभीषिका स्मृतिदिन 🇮🇳
१४ ऑगस्ट….
फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा…
असंख्य निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन!
भारताच्या इतिहासातील १४ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशासाठी जितका महत्त्वाचा होता, तितकाच तो वेदना, विस्थापन आणि मानवी शोकांतिकेचा काळ घेऊन आला.

भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात लाखो कुटुंबे आपल्या मातृभूमी, घरदार आणि माणसांपासून तुटली. असंख्य निरपराध नागरिकांना प्राण गमवावे लागले, तर कोट्यवधी लोकांना आपल्या मुळापासून उखडून अनोळखी भूमीकडे स्थलांतर करावे लागले.
ही केवळ भूभागाची फाळणी नव्हती;
ही माणसांच्या आयुष्यांवर उमटलेली खोल जखम होती.
त्या काळातील वेदना, संघर्ष, त्याग आणि बलिदान विसरता कामा नये. इतिहासातील या काळ्याकुट्ट अध्यायातून एकता, बंधुभाव, मानवता आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश घेऊन पुढे जाणे हीच त्या असंख्य ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
🕯️ फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या लाखो निरपराध देशवासियांना विनम्र आदरांजली!
“इतिहास विसरायचा नसतो…
त्यातून शिकून राष्ट्र अधिक भक्कम करायचे असते!”
🇮🇳 अखंड भारताच्या एकतेसाठी,
मानवतेच्या रक्षणासाठी आणि राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी संकल्प करूया!
– 🇮🇳अभिभावक 🇮🇳
विशाल प्रभाकर परब
भाजपा राज्य युवा नेते.



