सिंधुदुर्ग : भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गच्या संघटनात्मक विस्ताराला आणखी बळकटी देताना ओबीसी मोर्चाची जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीत धिरेंद्र राजेंद्र म्हापसेकर यांची सावंतवाडी शहर भाजपा ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी सातत्याने सक्रिय असलेल्या धिरेंद्र म्हापसेकर यांच्या खांद्यावर आता महत्त्वाची संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे सावंतवाडी शहरातील ओबीसी मोर्चाच्या संघटनात्मक कार्याला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

म्हापसेकर यांच्या नियुक्तीबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपा राज्य युवा नेते विशाल परब, जिल्हा परिषद सदस्य संदीप गावडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष महेश पारकर यांच्यासह भाजपाचे तमाम नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच, नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देत पक्षसंघटन अधिक बळकट करण्यासाठी त्यांच्या कार्याला यश लाभावे, अशी सदिच्छाही व्यक्त केली.
संघटन मजबूत करण्याची जबाबदारी, कार्यकर्त्यांना जोडण्याचे आव्हान आणि पक्षविचार घराघरात पोहोचविण्याचा संकल्प या त्रिसूत्रीने धिरेंद्र म्हापसेकर आपल्या नव्या जबाबदारीला न्याय देतील, असा विश्वास भाजपा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.



