वैभववाडीत सप्टेंबरमध्ये रंगणार तालुकास्तरीय ‘श्रावणसरी’ काव्यसंमेलन. ; अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचचा स्तुत्य उपक्रम.

वैभववाडी : अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंच, वैभववाडी यांच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील कवी-कवयित्री, साहित्यिक व साहित्यप्रेमींसाठी तालुकास्तरीय ‘श्रावणसरी’ काव्यसंमेलनाचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्यात आले आहे. वैभववाडी तालुक्यातील कवी-कवयित्री, साहित्यिक व साहित्यप्रेमींनी या काव्यसंमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. सहभागी कवी-कवयित्रींना आपल्या आवडीची एक स्वरचित कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. तसेच काव्यसंमेलनाचे स्वरूप खुले ठेवण्यात आले असून, नोंदणी करणाऱ्या पहिल्या ३० कवींना कविता सादरीकरणाची संधी देण्यात येणार असून सहभागी सर्व कवींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. कविता सादरीकरणासाठी नावनोंदणीची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ आहे.
काव्य, साहित्य आणि संस्कृतीच्या माध्यमातून तालुक्यातील साहित्यिकांना एकत्र आणणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त कवी-कवयित्री व साहित्यप्रेमींनी सहभागी व्हावे.
नाव नोंदणीसाठी चेतन बोडेकर- ९४२१२६६६२१, प्रफुल्ल जाधव – ९४२१२६७३१३ व संदेश तुळसणकर-
९६५७५७४५५ यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच या कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा लवकरच जाहीर करण्यात येईल, असे अक्षरवैभव साहित्य संस्कृती मंचचे अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील, सचिव चेतन बोडकेर यांनी सांगितले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles