रत्नागिरीत ‘उदय’ तर राजापूर विधानसभा मतदारसंघात ‘किरण’ ; सामंत बंधूंची प्रतिष्ठा पणाला लागणार.!

रत्नागिरी :  शिवसेना (शिंदे गट) पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. मंत्री दीपक केसरकर यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्यात मंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळालं आहे.

शिंदे गटाच्या पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखडी मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. राजापूर मतदारसंघातून किरण सामान तर उदय सामंत हे रत्नागिरी मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

धनुष्यबाण चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रबळ दावेदार असलेले मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांची लढत विधानसभा निवडणुकीत राजापूर मतदारसंघात उबाठाच्या राजन साळवी यांच्याविरुद्ध असणार आहे. ‘कांटे की टक्कर’ अशी ही लढत होणार असल्याची चर्चा आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles