अखेर सावंतवाडी – बांदा – डेगवे – असनिये – घारपी एसटी बससेवा सुरू. ;  सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस केतनकुमार गावडे यांच्या मागणीला यश.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष श्री. भाऊसाहेब देसाई व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस केतनकुमार गावडे यांनी 2024 मध्ये बांदा – डेगवे मार्गे असनिये घारपी बससेवा चालू करण्यासाठी सावंतवाडी आगार प्रमुख यांना निवेदन दिले होते. सार्वजनिक बांधकाम व वनविभाग यांची परवानगी घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी कणकवली येथील कार्यालयात पाठविण्यात आले. तद्नंतर गेली 2 वर्षे याबाबत सतत पाठपुरावा चालू होता आणि 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सावंतवाडी बांदा डेगवे मार्गे घारपी बससेवा सुरू करण्यात आली.
सदर बससेवा आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आली. याप्रसंगी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस केतनकुमार गावडे, डेगवे व तांबोळी ग्रामस्थ यांच्या शुभहस्ते बांदा एसटी स्टँड व डेगवे ग्रामपंचायत याठिकाणी शुभारंभ करण्यात आला. यावेळी डेगवे माजी सरपंच मंगलदास देसाई व ग्रामपंचायत सद्स्य विजय देसाई यांचे देखील सहकार्य लाभले आणि तेही उपस्थित होते.

यासाठी डेगवे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ व्यक्ती या सर्वांनी यश संपादन करण्यासाठी सहकार्य केले, अशी प्रतिक्रिया भाऊसाहेब देसाई यांनी बोलताना दिली. भाऊसाहेब देसाई यांनी यावेळी एसटी महामंडळ व सहकार्य करणाऱ्या सर्व जिल्हा व तालुका काँग्रेस पदाधिकारी, डेगवे गावातील सर्व ग्रामस्थ यांचे आभार मानले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles