दोडामार्ग: धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ,मुंबई संचलित सरस्वती विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज ऑफ सायन्स, कुडासे ता. दोडामार्ग जि. सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक जे. बी. शेंडगे हे होते. यावेळी ज्येष्ठ शिक्षक एल. के. डांगी, पी. बी. किल्लेदार, क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी, सांस्कृतिक प्रमुख रोशन मोरजकर यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,प्रशालेतील राष्ट्रीय खेळाडू सुरज देसाई,विष्णू देसाई,कु.सुचित्रा गोंधळी,प्रशालेचा मुख्यमंत्री वासूदेव गवस, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. क्रीडाशिक्षक सोमनाथ गोंधळी यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व खेळाचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. यानंतर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याध्यापक जे. बी. शेंडगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “अभ्यासाबरोबरच खेळालाही तेवढेच महत्त्व आहे. खेळामुळे शिस्त, सांघिक वृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित होतात. मेजर ध्यानचंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात चमकावे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक प्रमुख रोशन मोरजकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.



