LPG, CNG महागलं! ; आता पेट्रोल- डिझेलच्या किमतीही किती वाढल्या?

मुंबई : आज एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर झाल्यानंतर, सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या एचपीसीएल, आयओसीएल आणि भारत पेट्रोलियमने पेट्रोल आणि डिझेलचे दरही जाहीर केले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात ₹९.५० ने वाढ झाली आहे. मात्र, घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

दरम्यान, कच्च्या तेलाने पुन्हा एकदा प्रति बॅरल ९१ डॉलरचा टप्पा ओलांडला असून, पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दरही जाहीर झाले आहेत. ब्लूमबर्गच्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल ०.९१ डॉलरने वाढून ८६.६७ डॉलरवर होता, तर आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल ०.६२ डॉलरने वाढून ९१.११ डॉलरवर होता. मुंबईमध्ये १ सप्टेंबर २०२६ रोजी पेट्रोलचा दर १११.२१ रुपये प्रति लिटर इतका आहे म्हणजे पेट्रोलच्या दरात तरी अजून कोणताच बदल झालेला नाही.  मुंबईत 1 सप्टेंबर 2026 रोजी डिझेलचा दर ९७.८३ रुपये प्रति लीटर इतका आहे म्हणजे याचा अर्थ डिझेलच्या किमतीतही कोणताच बदल झालेला नाही.

एलपीजीचे दर काय?

मुंबईमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत ₹२७०१ आणि घरगुती सिलेंडरची किंमत ₹९४१.५० आहे. घरगुती वापराच्या सिलिंडरचे किमतीत कोणताचा बदल झाला नाही.

CNG दरात वाढ –

मध्य पूर्वेतील देशाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय निर्देशांकांशी निगडित इनपुट गॅसच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर, एमजीएलने सीएनजीच्या दरांमध्ये वाढ केली आहे. ही वाढ आजपासून म्हणजे 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात आले आहे.

आता महिन्याची सुरुवात ही लोकांसाठी महागाईच्या झटक्याने झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच साखर, दूध, सीएनजी, व्यावसायिक सिलिंडर या सगळ्यांच्या किमतीत थेट मोठी वाढ झाली आहे. सप्टेंबर महिना सर्वसामन्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे. कारण किमतीत थेट वाढ झाल्याने आता लोकांचे घरगुती बजेट एका झटक्यात वाढले आहेत. लोकांच्या खिशावर मोठा परिणाम पडणार असल्याचे दिसत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles