मुंबई : टीम इंडिया निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर राहणार की जाणार? याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. पण अजित आगरकर यांच्या पदाला कोणताही धक्का बसलेला नाही. निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम असणार आहे. मुंबईत बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला.

(फोटो: पीटीआय)
बीसीसीआयच्या बैठकीपूर्वी अजित आगरकर यांना पदावरून दूर सारलं जाणार अशा बातम्या आल्या होत्या. इतकंच काय तर व्हीव्हीएस लक्ष्मणकडे मोठी भूमिका सोपवली जाणार असंही बोललं जात होतं. पण या दोन्ही बातम्या खोट्या निघाल्या. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, व्हीव्हीएस लक्ष्मणला क्रिकेट डायरेक्टर असं कोणतंच पद दिलं जाणार नाही. सेंटर ऑफ एक्सिलेंसच्या अध्यक्षपदी कायम असणार आहे.

बीसीसीआयने सेक्रेटरी देवजीत सैकिया यांनी सांगितलं की, अजित आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम राहिल. निवड समितीत कोणताही बदल केला जाणार नाही. वनडे वर्ल्डकप 2027पर्यंत अशीच स्थिती राहणार आहे.
बीसीसीआयने रोहित शर्माच्या भवितव्याबाबतही निर्णय दिला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी रोहित शर्माच्या बॅटिंगची स्तुती केली. त्यामुळे रोहित शर्मा वनडेतून निवृत्त होणार नाही हे कन्फर्म झालं. इतकंच काय तर वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेच्या शर्यतीत राहील.

(फोटो: पीटीआय)



