दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दोडामार्ग येथे सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजपा युवा नेते विशाल परब, सावंतवाडी उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमाला दिव्यांग बांधवांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

वाढदिवसाच्या निमित्ताने केवळ शुभेच्छांचा औपचारिक सोहळा न करता गरजू आणि दिव्यांग बांधवांच्या जीवनात प्रत्यक्ष उपयोगी ठरणारा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देण्यात आला.

यावेळी भाजपा युवा नेते विशाल परब, दोडामार्ग मंडल अध्यक्ष दिपक गवस दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शहराध्यक्ष राजेश फुलारी, सरचिटणीस भैया पांगम, शिरीष नाईक यांसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य उमटले. समाजातील वंचित घटकांना आधार देण्याची भूमिका अशा उपक्रमांतून अधोरेखित होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
“वाढदिवसाचा आनंद समाजातील गरजू घटकांसोबत वाटून घेणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी”, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



