गणेशभक्तांची हाक अन् जितेंद्र गावकरांची तत्काळ धाव! ; इन्सुली क्षेत्रफळवाडीतील विसर्जनाचा अडथळा स्वतःचा डंपर पाठवून दूर. ; ‘कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी’ची गणेशभक्तांकडून कौतुकाची थाप.

सावंतवाडी : विघ्नहर्त्या गणरायाच्या विसर्जन सोहळ्यात अचानक निर्माण झालेला अडथळा आणि त्यावर क्षणाचाही विलंब न करता केलेली मदत… या प्रसंगातून कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी म्हणून पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्याची वेगळी छाप उमटवली.

इन्सुली क्षेत्रफळवाडी येथील गणेशभक्त गणरायाला विसर्जनासाठी घेऊन जात असताना विसर्जनस्थळी अडचण निर्माण झाली. त्यामुळे गणेशभक्तांसमोर मोठी समस्या उभी राहिली. याबाबत गणेशभक्त संजय राणे यांनी पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्याशी फोनवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली.

गणेशभक्तांची अडचण समजताच ‘समस्या सांगितली की मदत मिळेपर्यंत थांबायचे नाही’ या भूमिकेतून जितेंद्र गावकर यांनी कोणताही विलंब न करता स्वतःचा डंपर तात्काळ घटनास्थळी पाठवला. डंपरच्या माध्यमातून निर्माण झालेला अडथळा दूर करण्यात आला आणि गणेशभक्तांचा विसर्जनाचा मार्ग सुकर झाला.

गणेशोत्सवाच्या पावन पर्वात गणेशभक्तांच्या आनंदात कोणताही विघ्न येऊ नये, यासाठी दाखविलेली ही तत्परता उपस्थितांसाठी दिलासादायक ठरली. लोकप्रतिनिधी म्हणून केवळ पदावर न राहता, जनतेच्या अडचणीच्या क्षणी प्रत्यक्ष मदतीला धावून जाण्याची भूमिका जितेंद्र गावकर यांच्या कृतीतून अधोरेखित झाली.

दरम्यान, गावकर यांच्या या कर्तव्यदक्षता, तत्परता आणि सामाजिक बांधिलकीचे गणेशभक्तांनी मनापासून स्वागत केले असून, त्यांच्या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

गणरायाच्या विसर्जनातील विघ्न दूर करून गणेशभक्तांचा मार्ग सुकर करणाऱ्या या मदतीमुळे ‘लोकप्रतिनिधी म्हणजे जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारा आधार’ ही भावना पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles