सहवेदना – आनंद सावंत यांचे निधन.

कुडाळ :  पाटबंधारे विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आनंद शांताराम सावंत (वय ६९) यांचे काल मंगळवार रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे मुळ गाव वसोली पण ते गेली काही वर्षे झाराप येथे स्थायिक झाले होते. तिलारी आणि टाळंबा पाटबंधारे प्रकल्पात त्यांनी दीर्घकाळ योगदान दिले. त्यांचे गोवा येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, सुन असा परिवार आहे. ते दैनिक सकाळचे सिंधुदुर्ग जिल्हा आवृत्तीप्रमुख शिवप्रसाद देसाई यांचे मामा होत. झाराप येथे आज दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles