सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये उद्या आरोग्यसेवेचा जागर! ; संजू परब यांच्या पुढाकाराने उद्या मोफत जनआरोग्य तपासणी शिबीर. ; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन!

सावंतवाडी : निरोगी आयुष्य हीच खरी संपत्ती आणि आरोग्याची काळजी हीच सुखी जीवनाची गुरुकिल्ली, हा विचार केंद्रस्थानी ठेवत सावंतवाडी शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधील खासकीलवाडा परिसरात नागरिकांसाठी मोफत जनआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक सच्चिदानंद ऊर्फ संजू परब आणि नगरसेविका सौ. स्नेहा सुनील नाईक यांच्या पुढाकारातून हा आरोग्यसेवेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

उद्या शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खासकीलवाडा येथील वटसावित्री मंदिरात हे शिबिर पार पडणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या या शिबिरात नागरिकांच्या विविध आरोग्यविषयक तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत.

या शिबिरामध्ये हिमोग्लोबिन, कॅल्शियम, कोलेस्ट्रॉल, किडनी आणि लिव्हर यांसह विविध महत्त्वाच्या आरोग्य तपासण्यांचा समावेश आहे. दैनंदिन धावपळीत अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, वेळेवर तपासणी केल्यास संभाव्य आरोग्यसमस्या वेळीच लक्षात येण्यास मदत होते. याच जाणिवेतून नागरिकांना त्यांच्या परिसरातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आरोग्य तपासणीसाठी आता दूर जाण्याची गरज नाही; आपल्या परिसरातच मिळणार मोफत तपासणीची सुविधा! या संधीचा खासकीलवाडा परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक संजू परब आणि नगरसेविका स्नेहा नाईक यांनी केले आहे.

लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून आरोग्यसेवेचा हात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम नागरिकांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविण्यास निश्चितच हातभार लावणारा ठरणार आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles