नवरात्रोत्सवानिमित्त तळेरे येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद! ; बाजारपेठ मित्रमंडळाचा पुढाकार, एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल ब्लड सेंटर, पडवे यांचे सहकार्य.

तळेरे : सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदतीचा हात देणाऱ्या तळेरे येथील बाजारपेठ मित्रमंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व जपले.

एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज आणि लाईफटाईम हॉस्पिटल ब्लड सेंटर, पडवे यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. सुहास पिसे यांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदानासारख्या उपक्रमांतून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

यावेळी बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष साई डंबे, अर्णव पिसे, पप्या कल्याणकर, सचिन वाडेकर, मनोज भांबुरे, स्वप्नील कल्याणकर आणि धनलक्ष्मी तळेकर यांच्यासह एस. एस. पी. एम. मेडिकल कॉलेज व लाईफटाईम हॉस्पिटल ब्लड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि बाजारपेठ मित्र मंडळाचे सर्व सदस्य, सल्लागार उपस्थित होते.

बाजारपेठ मित्रमंडळ नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असून, गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदत करण्यासाठीही मंडळ पुढाकार घेत असते. या रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद मंडळाच्या सामाजिक कार्याला बळ देणारा ठरला. हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मित्र मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles