बांदा मराठा समाजाकडून तलाठी कार्यालयाला छत्रपती शिवरायांची प्रतिमा सप्रेम भेट! ; शिवरायांच्या प्रेरणादायी विचारांचा वारसा जपण्याचा स्तुत्य उपक्रम.

बांदा :  स्वराज्याचा ध्यास, न्यायनीतीचा आदर्श, रयतेवरील अपार प्रेम आणि लोककल्याणाचा धगधगता विचार… अशा असामान्य कर्तृत्वाने अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ठरलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर शासकीय कार्यालयांमध्येही व्हावा, या उदात्त भावनेतून बांदा मराठा समाजाने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. बांदा मराठा समाजाच्या वतीने बांदा येथील तलाठी कार्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सप्रेम भेट देण्यात आली.

बांदा येथील तलाठी कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तलाठी फिरोज खान यांच्याकडे महाराजांची प्रतिमा सुपूर्द करण्यात आली. केवळ एका प्रतिमेची भेट नव्हे, तर शिवरायांचे विचार, त्यांचे महान कार्य, स्वराज्याची संकल्पना आणि लोककल्याणकारी शासनव्यवस्थेचा आदर्श नव्या पिढीपर्यंत तसेच समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा हा एक प्रेरणादायी प्रयत्न ठरला.

 

शासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आणि तेथील अधिकारी-कर्मचाऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची, विचारांची आणि आदर्श राज्यकारभाराची सातत्याने प्रेरणा मिळावी, या भावनेतून मराठा समाजाने हा उपक्रम हाती घेतला. महाराजांची प्रतिमा कार्यालयात विराजमान झाल्याने स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठा, न्यायप्रियता आणि जनसेवेची प्रेरणा अधिक दृढ होईल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमावेळी बांदा मराठा समाजाचे अध्यक्ष परिमल सावंत, उपाध्यक्ष विनोद सावळ, सहसचिव हेमंत मोर्ये-सावंत, खजिनदार महादेव सावंत-मोर्ये, सदस्य भूषण सावंत, लवू रेडकर, सदस्या सौ. अवंती पंडित, सौ. लक्ष्मी सावंत, माजी खजिनदार राकेश परब, अजित दळवी यांच्यासह अन्य मराठा बांधव उपस्थित होते.

महाराजांची प्रतिमा म्हणजे केवळ भिंतीवरील छायाचित्र नव्हे, तर प्रत्येकाच्या मनात कर्तव्याची जाणीव, न्यायाची आस आणि लोकसेवेची प्रेरणा जागविणारा विचारांचा दीपस्तंभ आहे. बांदा मराठा समाजाचा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles