वेगुर्लेतील रंगकर्मी सौरभ माळवदे यांना प्रतिष्ठित ‘महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान.

​सावंतवाडी :  युवा परिवर्तन परिषद व गौरव सोहळा – डोंबिवली २०२६ च्या वतीने कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य (रजि.) यांच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांची गौरवार्थ निवड केली जाते. या निवडीनुसार, वेगुर्ले येथील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्त्व  सौरभ माळवदे यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक योगदानाची आणि कर्तृत्वाची दखल घेत ‘महाराष्ट्र कलाभूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
​या विशेष सोहळ्याचे आयोजन श्री गणेश संस्थान, रेल्वे स्टेशन जवळ, डोंबिवली (पूर्व), जि. ठाणे येथे करण्यात आले होते.

सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांच्या शुभहस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
​मा. सौरभ माळवदे यांची या मानाच्या पुरस्कारासाठी झालेली निवड म्हणजे त्यांच्या कला व समाज क्षेत्रातील निरंतर कार्याचा गौरव आणि समाजाप्रती असलेल्या योगदानाची पावतीच आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत असून पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles