सावंतवाडी: महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा उद्या गुरूवारी दु. १.३० वा. शुभारंभ होणार आहे. सावंतवाडीच आराध्य दैवत, श्री देव पाटेकर मंदीर येथे श्रीफळ ठेवून निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
तसेच सावंतवाडीतील इतर देवदेवतांचे आशीर्वाद मंत्री दीपक केसरकर घेणार आहेत. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे हे उद्या सावंतवाडी दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई यांनी केल आहे.