सावंतवाडी : निवडणूक आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोगाची यंत्रणा जेव्हा आपल्या गाडीचे किंवा सामानाचे चेकिंग करते तेव्हा अनेक नेत्यांचा इगो हर्ट होतो. अशाच चेकिंग मध्ये उद्धव ठाकरे किती संतापले होते हे देखील जनतेने पाहिले, तर दुसरीकडे त्यांच्या संतापाला ट्रोलिंग करत भाजपाने ही देवेंद्र फडणवीस यांच्या बॅगेचे चेकिंग झाल्याचा व्हिडिओ टाकला होता. आपल्या बॅगेचे चेकिंग होताच उद्धव ठाकरे यांनी अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्या सामानाचेही हिंमत असेल तर चेकिंग करून दाखवा असे आव्हान दिले होते तर निवडणूक आयोग कायद्याप्रमाणे काम करत असून प्रसंगी अमित शहांचे हेलिकॉप्टर सुद्धा चेक केले जाईल, असे प्रत्युत्तर दिले होते.
अमित शहा किंवा नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टर चेकिंगचे पुढे काय झाले माहित नाही, पण सावंतवाडीमधील सध्या फुल्ल चर्चेत असलेल्या अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या गाडीचे चेकिंग मात्र आज कसून करण्यात आले. विशाल परब हे संयमी आणि शांत नेतृत्व म्हणून ओळखले जाते. यावेळी त्यांनी पोलिसांना शांतपणे आपले काम करू दिले. गाडीत आक्षेपार्ह असे काहीच न मिळाल्यानंतरही किंचित सुद्धा अकाउंट तांडव न करता पोलिसांची आस्थेने चौकशी केली आणि हसतमुखाने त्यांचा निरोप घेऊन ते पुढील दौऱ्यावर निघून गेले. त्यांच्या गाडीतील सामानाच्या चेकिंगचा आणि त्यांच्या हसतमुख वागणुकीचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.