Wednesday, July 16, 2025

Buy now

spot_img

सहकारात संचय नको समृद्धी हवी.! : जिल्हाधिकारी अनिल पाटील. ; कणकवली येथे तथागत पतपेढीचा शानदार शुभारंभ!

कणकवली :  कोकण म्हणजे निसर्गाची खाण असून नररत्नांची जननी आहे. मात्र सहकारात कोकण मागे असून कोकणात सहकार रुजल्याशिवाय खऱ्या अर्थाने समृद्धी येणार नाही .तथागत नागरी पतसंस्था ही सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांची असल्याने त्यांना आर्थिक संचय ही मोठा आहे .मात्र नुसत्या ठेवी ठेवून आर्थिक संचय वाढविण्यापेक्षा गरजूंना सक्षम करून स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न पतपेढीने करावा म्हणजे खऱ्या अर्थाने आर्थिक समृद्धी निर्माण होऊ शकेल असे आवाहनात्मक प्रतिपादन. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज मंगळवारी कणकवली येथे व्यक्त केले.

तथागत नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग या पतसंस्थेच्या कणकवली येथील भगवती मंगल कार्यालय सभागृहात आयोजित उद्घाटन समारंभात जिल्हाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरविंद वळंजू हे होते. यावेळी कणकवली प्रांत अधिकारी जगदीश कातकर , तहसीलदार दीक्षांत देशपांडे , कणकवलीचे सहाय्यक निबंधक कृष्णकांत धुळप ,जिल्हा बँकेचे सर व्यवस्थापक दीपक पडेलकर ,मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त उपमुख्य अभियंता संजय जाधव पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी श्रीधर गॅस एजन्सीच्या पहिल्या मजऱ्यावरील पतसंस्थेच्या कार्यालयातील नामफलकाचे अनावरण जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर तेथे बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर भगवती मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री पाटील उद्घाटक म्हणून बोलत होते तत्पूर्वी त्यांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ना पुष्प हार घालून पतपेढीच्या विविध योजनांच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी व मान्यवरांचे स्वागत अरविंद वळंजू , उपाध्यक्ष सूर्यकांत कदम ,संचालक मोहन जाधव ,मिलिंद सरपे ,सुहास कदम आनंद धामापूरकर ,सिद्धार्थ कदम इत्यादी मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व संविधान पुस्तिका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी सहकार हा जसा चालवता तसा तो चालतो मात्र तथागत पतसंस्थेत सर्वच निवृत्तांचा भरणा असल्याने त्यांच्याकडे शिस्त काटेकरपणा व निस्वार्थीपणा असल्याने पतसंस्थेच्या जडणघणीत त्याचे प्रतिबिंब उमटेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वतःच्याच स्वयंप्रेरणेने सहकारात आगळावेगळा ठसा तुम्ही उमटावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली .व जय भीम समृद्ध ठेव योजनेत आपली ठेव जाहीर केली.. यावेळी दीपक पडेलकर यांनी सहकारात समाजाचे होणारे पदार्पण याचा आपणाला अवर्णनीय आनंद व्यक्त करून कृतीला विचारांची गरज असल्याचे स्पष्ट केले .संजय जाधव यांनी बेरोजगारी ही आपली मोठी समस्या असल्याने रोजगारनिर्माण करण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली .व पतसंस्थेला आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. सहनिबंधक धुलप यांनी पतसंस्था आणि राष्ट्रीय बँक यामधील फरक सांगून पतसंस्थेचा पाया भक्कम असेल तर पतसंस्था येण्यास उशीर लागत नाही हे सांगून या पतसंस्थेची सुरुवात चांगली झाल्याने हे पतसंस्था आपल्या कार्याने आदर्श निर्माण करू शकेल याची ग्वाही दिली तर दीक्षांत देशपांडे यांनी सहकारात सचोटीने काम केल्यास सहकार रुजू शकतो हे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी करून सेवानिवृत्त संघटनेची पार्श्वभूमी आणि त्याच बैठकीत पतसंस्थेची गरज यावर झालेल्या वहा पोहा हे सांगून हे तीन वर्षाच्या आता प्रयत्नानंतर पतसंस्थेला आज मूर्त स्वरूप आल्याचा आनंद व्यक्त केला मात्र हा आनंद व्यक्त करतानाच समाजाने आम्ही लावलेले हे रोपटे मोठे करण्यासाठी योगदान द्यावं असे आवाहन केले तर अध्यक्षपदावरून बोलताना श्री अरविंद वळणजू यांनी प्रत्येक समाजाच्या पतपेढी आहेत आपोआप बौद्ध समाज होता समाज संख्येने मोठा असूनही समाजाची अद्याप पतपेढी नसणे ही उणीव भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे मात्र पतसंस्थेला पुढे नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असा आवाहन करून पतसंस्थेत सर्वांना सामान्य देण्याचे धोरण असल्याचे सांगून इथे कसलाही भेदाभेद न करतापतसंस्थेच्या योजनांचा समाजाने फायदा घेऊन आपल्याबरोबर पतसंस्थेचेही पथक वाढवावे असे आवाहन केले यावे शुभारंभाच्या जय भीम ठेवण्यात गुंतवणूक केलेल्या शिवाय पतसंस्थेच्या उभारणीत मौल्यवान कामगिरी करणाऱ्या शिवाय जास्त भाग भांडवल शेअर्स घेणाऱ्यांचा सत्कारही मान्यवरांचे हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिनेस्टार निलेश पवार यांनी आपल्या शैलीत केले तर आभार मोहन जाधव यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील विविध क्षेत्रा तील मान्यवर उपस्थित होते.

ADVT – 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles